पंतप्रधान कार्यालय
भूतानच्या राजांतर्फे पंतप्रधानांना अभिनंदनपर दूरध्वनी
भूतानच्या राजांच्या हार्दिक शुभेच्छांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी मानले आभार
भारत आणि भूतान यांच्यादरम्यानच्या अनुकरणीय संबंधांबाबतच्या वचनबद्धतेला दोन्ही नेत्यांनी दिला दुजोरा
Posted On:
05 JUN 2024 10:15PM by PIB Mumbai
देशात नुकत्याच पार पडलेल्या 18 व्या लोकसभा निवडणुकीत एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी भूतानचे राजे, महामहीम जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली. यावेळी भूतानच्या राजांनी पंतप्रधानांना हार्दिक शुभेच्छा देऊन पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील जनतेला सतत प्रगती आणि समृद्धी लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली.
भूतानच्या राजांनी दिलेल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आभार व्यक्त केले. भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीच्या अनुकरणीय संबंधांचा पुनरुच्चार करून पंतप्रधानांनी भूतानच्या शाही सरकारसोबत काम करण्याप्रती तसेच ही वैशिष्ट्यपूर्ण द्विपक्षीय भागीदारी नव्या उंचीवर पोहोचवण्याप्रती असलेल्या भारत सरकारच्या कटिबद्धतेला दुजोरा दिला.
भारत आणि भूतान यांच्यातील भागीदारी सर्व स्तरांवर संपूर्ण विश्वास, सद्भावना आणि परस्पर सामंजस्य यांनी युक्त आहे तसेच ही भागीदारी दोन्ही देशांतील जनतेमध्ये असेले दृढ संबंध आणि सखोल आर्थिक तसेच विकासात्मक भागीदारीमुळे अधिक मजबूत झाली आहे.
***
JPS/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2023051)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam