भारतीय निवडणूक आयोग

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पात्र मतदारांसाठी देशभरात प्रथमच गृह मतदानाची सुविधा उपलब्ध

Posted On: 29 MAY 2024 4:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मे 2024

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्वसमावेशकता आणि सुगम्यता सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पावले उचलली आहेत जेणेकरून कोणताही पात्र मतदार शारीरिक किंवा इतर अडथळ्यांमुळे त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही.  आतापर्यंत, निवडणुकीचे 6 टप्पे संपल्यानंतर, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, विशेष दुर्बल  आदिवासी गट अशा विविध गटातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.  85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि 40% हून अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांगांसाठी घरच्या आरामदायी वातावरणात मतदान करण्याची सुविधा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रथमच संपूर्ण भारतात  उपलब्ध करून देण्यात आली.

  

Lambada Tribe at Polling Station of Thiruvur Constituency, Shompen tribe of Great Nicobar voted for the first time in a General Election and Nishi Tribe in Arunachal Pradesh

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ सुखबीर सिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली देशभरात झालेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे ज्या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसभा निवडणूक - 2024 च्या 6 व्या टप्प्यातील निवडणुका पूर्ण झाल्या आहेत तेथे अनेक यशोगाथा पाहायला मिळाल्या आहेत. "जागतिक स्तरावर नवीन मानके स्थापित करणाऱ्या भारतीय निवडणूक प्रक्रियेत सतत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे हा आयोगाचा दृढ संकल्प आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. या निवडणुका, आपल्या देशाचा अभिमान असलेल्या अनेकतेची आणि विविधतेची भावना प्रतिबिंबित करणाऱ्या घडवणे, हा भारतीय निवडणूक आयोगाचा निर्धार असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वसमावेशकतेची आणि सुगम्यतेची  तत्त्वे आणि पद्धती अंतर्भूत करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग समर्पित असून जगासमोर एक उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.

A senior citizen elector on the way to cast her vote in Arunachal Pradesh.

 

पर्यायी गृह-मतदान सुविधा: भारतातील सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच उत्कृष्ठ प्रतिसाद लाभला

पर्यायी गृह मतदान सुविधेने  निवडणूक प्रक्रियेत एक आमूलाग्र  बदल घडवून आणला असून ही सुविधा भारताच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांचे वय 85 वर्षे  किंवा त्यापेक्षा अधिक आहे किंवा 40% हून अधिक अपंगत्व असलेला कोणताही पात्र नागरिक या निवडणुकांमध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतो.  या सुविधेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.  देशाच्या सर्व भागातून समाधानी मतदारांची आनंददायी दृश्ये आणि स्वतःच्या घरातून  मतदान करणाऱ्या या मतदारांच्या समाधानी प्रतिक्रियांचा समाज माध्यमावर पूर आला आहे.  मतदान कर्मचाऱ्यांच्या आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण चमूच्या सहभागातून मतदानाच्या गुप्ततेचे काळजीपूर्वक पालन करत गृह मतदान केले जात आहे.

 

Smt. D. Padmavathi, 100 years of age, from Kovvuru Constituency and a Sr. Citizen elector from Arunachal Pradesh

Eight PwD members of same family availing home facility in Churu, Rajasthan

 

अडथळे दूर करणे : चांगल्या सहभागासाठी पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करणे.

कोणत्याही पायाभूत सुविधांची तफावत भरून काढण्यासाठी, केंद्रीय  निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्र तळमजल्यावर असेल आणि प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प, मतदारांसाठी चिन्हे, पार्किंगची जागा, स्वतंत्र रांगा आणि स्वयंसेवकांसह खात्रीच्या सुविधांनी सुसज्ज असेल हे सुनिश्चित केले आहे.  याव्यतिरिक्त, निवडणूक आयोगाच्या सक्षम ॲपद्वारे दिव्यांगांना मतदान केंद्रावर व्हीलचेअर,  नेण्याची आणि आणण्याची सुविधा तसेच स्वयंसेवक सेवा यासारख्या विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी विशेष सुविधा दिली आहे.

आयोगाने दृष्टिहीन मतदारांना मदत करण्यासाठी ईव्हीएम मशीनवर ब्रेल लिपी, ब्रेल सक्षम EPIC आणि मतदान चिठ्ठीची तरतूद केली आहे.

In Indore, Madhya Pradesh, 70 visually handicapped girls were assisted with free transportation to cast their vote.

PwD managed PS in J&K

Photos: Braille-coded voter cards distributed to visually impaired electors  | Hindustan Times   

Braille enabled EPIC, Voter Guide, volunteer at a polling station in Bihar and provision of shamiyana at a polling station in Odisha

 

उत्साहपूर्ण समावेशकता: मतदानातील मानसिक अडथळे दूर करणे.

मतदानातील भौतिक अडथळे दूर करण्याबरोबरच, भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत तृतीयपंथी, लैंगिक कामगार, विशेष दुर्बल आदिवासी गट यासारख्या काही उपेक्षित गटांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी, त्यांच्या भोवतालचे सामाजिक अडथळे आणि कलंक दूर करण्यासाठी देखील प्रयत्न केले.  ठाणे जिल्ह्यात नागरी संस्थांच्या सहकार्याने तृतीयपंथी मतदार तसेच लैंगिक कामगार आणि विशेष दुर्बल आदिवासी गट  यासारख्या इतर उपेक्षित समुदायांची नोंदणी करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/1BPQT.jpeg

Commission awarding the trophy to the winners at the T-20 Match

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दिव्यांगांद्वारे व्यवस्थापित करण्यात आलेले किमान एक मतदान केंद्र स्थापन करण्यासाठी आयोगाने शक्य तितके प्रयत्न केले. लोकसभा निवडणूक-2024 साठी, देशभरात दिव्यांगांद्वारे संचालित  सुमारे 2697 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

 

असुरक्षित समुदायांसाठी नोंदणी आणि मतदान सुलभ करणे

पूर्वीच्या अतिदुर्गम भागात नवीन मतदान केंद्रे स्थापन झाल्यामुळे विशेष दुर्बल आदिवासी (पीव्हीटीजी ) समाजाचा मतदानात मोठ्या प्रमाणात समावेश झाला आहे.अनेक राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये, जेथे पीव्हीटीजी  मोठ्या संख्येने राहतात, अशा दुर्गम भागातून ते मतदान केंद्रांपर्यंत पोहोचू शकतील यासाठी मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एक ऐतिहासिक उदाहरण द्यायचे झाल्यास; ग्रेट निकोबार येथील शॉम्पेन नावाच्या जमातीने पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक-2024 मध्ये मतदान केले.

 

भागीदारी

निवडणूक जागरूकता वाढवण्यासाठी आणि निवडणुकांमध्ये भागीदारी आणि सर्वसमावेशकतेची भावना निर्माण करण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाने अकरा दिव्यांग व्यक्तींना “भारतीय निवडणूक आयोगाचे विशेष दूत" म्हणून नियुक्त केले आहे जेणेकरुन या समाजाला निवडणूक प्रक्रियेत सामील करून घेता येईल. निवडणुकीत सहभाग आणि आपलेपणाची भावना विकसित करण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांना दिव्यांगांच्या विशेष गरजांबद्दल प्रशिक्षित आणि संवेदनशील केले गेले आहे.

Camps organized in Gangtok by DEO in collaboration with Women & Child Development and Health Department

तसेच, निवडणूक आयोग अधिकाऱ्यांच्या पथकाने ठाणे जिल्हा आणि मुंबई शहरातील कामाठीपुरा येथे भेट दिली, जेणेकरून या भागात राहणाऱ्या किन्नर आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला कामगारांशी मोकळेपणाने  संवाद साधून,त्यांना निवडणुकीतील सहभागामध्ये येणाऱ्या आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊन क्षेत्रीय यंत्रणांना संवेदनशील बनवता येईल आणि लोकसभा निवडणूक-2024 मध्ये त्यांचा सहभाग सुनिश्चित होईल.

ECI team with NGOs/CSOs and TG community in Thane District and encouraging them to ensure 100% participation in the Lok Sabha Election.

दिव्यांग मतदारांना लोकसभा निवडणूक-2024 मध्ये त्यांचा मताधिकार वापरण्यास प्रोत्साहित  करण्यासाठी आयोगाने अर्जुन पुरस्कारप्राप्त आणि पॅरा आर्चर शीतल देवी यांची राष्ट्रीय विशेष दूत म्हणून नियुक्ती केली.शिवाय, आयोगाने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत देखील राज्य दिव्यांग विशेष दूत  नियुक्त केले आहेत.

https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2024/03/para.jpg

Ms. Sheetal Devi, National PwD Icon, ECI

 

In Mehsana district in Gujarat, a wheelchair rally was organized by PwD electors to create awareness

An extensive campaign including “Matdata appeal patra” was launched to enhance PVTG participation in the ongoing elections.

शेवटच्या गावातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच"कोणताही मतदार मागे राहणार नाही" हे सुनिश्चित  करण्यासाठी आयोग वचनबद्ध आहे आणि देशाच्या सर्वात दुर्गम भागात राहणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आयोगाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.उदाहरणार्थ, गुजरातमधील अलियाबेटमध्ये एका शिपिंग कंटेनरमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले होते; जेणेकरून या भागात राहणाऱ्या आदिवासी मतदारांपर्यंत पोहोचता येईल.  त्याचप्रमाणे, छत्तीसगडमधील बस्तर आणि कांकेर लोकसभा मतदारसंघातील 102 गावांत मतदारांनी त्यांच्याच गावात उभारलेल्या मतदान केंद्रावर प्रथमच  या लोकसभा निवडणुकीत मतदान केले.

Polling station for just five members of a family in a remote village of Warshi in Leh district, Ladakh

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुका 2024 मध्ये काश्मिरी स्थलांतरितांना मतदानाची सुविधा देण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेऊन, निवडणूक आयोगाने जम्मू आणि उधमपूरमध्ये राहणाऱ्या खोऱ्यातील विस्थापित लोकांसाठी फॉर्म-M भरण्याची किचकट प्रक्रिया रद्द केली.  याव्यतिरिक्त, जम्मू आणि उधमपूरच्या बाहेर निवास असणाऱ्या स्थलांतरितांसाठी (जे फॉर्म M भरणे  सुरू ठेवतील), निवडणूक आयोगाने फॉर्म-M सोबत जोडलेल्या प्रमाणपत्राचे स्व-साक्षांकित  अधिकृत केले आहे, त्यामुळे हे प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्याद्वारे प्रमाणित करून घेण्याचा त्रास दूर होईल.आयोगाने दिल्ली, जम्मू आणि उधमपूरमधील विविध मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्या काश्मिरी स्थलांतरित मतदारांना नियुक्त केलेल्या विशेष मतदान केंद्रांवर वैयक्तिकरित्या मतदान करण्याचा किंवा टपाली मतपत्रिका  वापरण्याचा पर्याय दिला  आहे.  जम्मू येथे 21, उधमपूर येथे 1 आणि दिल्ली येथे अशी 4 विशेष मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

  

Kashmiri migrants casting their vote at Special Polling Stations

त्याचप्रमाणे, मणिपूरमधील अंतर्गत विस्थापित व्यक्तींना (IDPs) मतदानाचा हक्क सुनिश्चित करण्यासाठी,10 जिल्ह्यांमध्ये 94 विशेष मतदान केंद्रे  स्थापन करण्यात आली.  तेंगनौपाल जिल्ह्यात एका मतदारासाठी एक विशेष मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते.

  

IDP in Manipur casting their vote at Special Polling Stations

 

* * *

S.Kane/Shraddha/Sampada/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022083) Visitor Counter : 124