भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

गेल्या 35 वर्षातील सार्वत्रिक निवडणुकांमधील सर्वाधिक मतदानाची नोंद करत, जम्मू आणि काश्मीरने भारताच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये उमटवला अमीट ठसा

Posted On: 27 MAY 2024 5:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 मे 2024

 

देशाच्या निवडणुकीच्या मतदानात एक मोठी झेप घेत जम्मू आणि काश्मीरने गेल्या 35 वर्षातील सर्वात जास्त निवडणूक सहभागाची नोंद केली आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या संपूर्ण केंद्रशासित प्रदेशातील( लोकसभेच्या 5 जागांसाठी) मतदान केंद्रांवर 58.46 % इतक्या एकत्रित मतदानाची(VTR) नोंद झाली. निवडणुकीतील हा लक्षणीय सहभाग म्हणजे या प्रदेशातील जनतेच्या भक्कम लोकशाही भावनेचा आणि नागरी सहभागाचा एक पुरावा आहे. या केंद्रशासित प्रदेशात अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांचे आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

जम्मू आणि काश्मीरच्या मतदारांसाठी  भारतीय निवडणूक आयोगाच्या शुभेच्छा व्यक्त करताना राजीव कुमार म्हणाले, “2019 पासून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत झालेली 25% वाढ, सी-व्हीजिल तक्रारींवरून दिसणारा नागरिकांचा वाढता सहभाग आणि सुविधा पोर्टलवर रॅली काढण्यासाठी विनंती करणारे 2455 अर्ज इ. द्वारे प्रतिबिंबित होत असलेला, साशंकतेपासून दूर जात एका निश्चित विश्वासाने, संपूर्ण सहभागाने निवडणुका आणि प्रचाराच्या अवकाशाकडे वळलेला कल   यांच्या आधारावर ही उल्लेखनीय कामगिरी झाली आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात मुख्यत्वे श्रीनगर, बारामुल्ला, अनंतनाग राजौरी, उधमपूर आणि जम्मू या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या पाच लोकसभा मतदारसंघात गेल्या काही निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानाची माहिती खालीलप्रमाणे आहेः

PC of Ladakh has been removed which was part of erstwhile state of J&K for comparison.

** Graph depicts Gross VTR for 1996-2019; For 2024, VTR is at polling stations

काश्मीर खोऱ्यातील तीन लोकसभा मतदारसंघात झालेले 50.86% मतदान लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास अधोरेखित करत आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये केवळ 19.16% असलेल्या मतदानाच्या टक्केवारीत 30 अंकांच्या उसळीची नोंद झाली आहे. निवडणूक आयोग आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना या केंद्रशासित प्रदेशातील ऐतिहासिक प्रतिसादाचे श्रेय द्यावे लागेल, ज्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील जनतेच्या सक्षमीकरणासाठी, विशेषतः युवा वर्गाला या निवडणुकीत सहभाग घेण्यासाठी अथक प्रयत्न केले. अधिकाधिक युवा वर्गाने त्यांच्या विश्वासाचा पुनरुच्चार केला आहे आणि मोठ्या प्रमाणात लोकशाहीचा अंगिकार केला आहे. या मतदारांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामधील बहुसंख्य मतदार हे 18-59 या वयोगटातील आहेत. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची उच्च टक्केवारी म्हणजे लोकशाहीवरील त्यांच्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे, जी एक सकारात्मक आणि  उत्साहवर्धक घडामोड आहे.

Note: Due to delimitation exercise, the voter turnout data from previous elections for the PCs, may not be directly comparable

*Graph depicts Gross VTR for 1996-2019; For 2024, VTR is at polling stations

जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील नोंदणीकृत मतदारांचे वयानुसार वितरण (एका लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची टक्केवारी)

Age Groups

Baramulla

Srinagar

Anantnag-Rajouri

Udhampur

Jammu

18 - 39 Years

56.02

48.57

54.41

53.57

47.66

40 - 59 Year

30.85

34.87

31.59

32.65

35.28

18 - 59 Years

86.87

83.44

86.00

86.22

82.94

60 & Above

13.13

16.56

14.00

13.78

17.06

दिल्ली, जम्मू आणि उधमपूर अशा विविध ठिकाणी मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्या काश्मिरी स्थलांतरित मतदारांना देखील आयोगाने नामांकित विशेष मतदान केंद्रांवर मतदान करण्याची किंवा टपाल मतदानाच्या सुविधेचा वापर करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. जम्मूमध्ये 21, उधमपूरमध्ये 1 आणि दिल्लीत 4 विशेष मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.   

गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघात झालेले एकूण मतदान

PC/Year

2019

2014

2009

2004

1999

1998

1996

1989

Srinagar

14.43%

25.86%

25.55%

18.57%

11.93%

30.06%

40.94%

Uncontested

Baramulla

34.6%

39.14%

41.84%

35.65%

27.79%

41.94%

46.65%

5.48%

Anantnag

8.98%

28.84%

27.10%

15.04%

14.32%

28.15%

50.20%

5.07%

Udhampur

70.15%

70.95%

44.88%

45.09%

39.65%

51.45%

53.29%

39.45%

Jammu

72.5%

67.99%

49.06%

44.49%

46.77%

54.72%

48.18%

56.89%

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या क्षेत्रात स्वीपचा एक भाग म्हणून जागरुकता आणि संपर्कासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने मतदानविषयक संदेशांचा प्रसार करण्यासाठी क्रीडा स्पर्धा, चर्चासत्रे, जागरुकता मेळावे, पथनाट्ये आणि इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. 

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2021834) Visitor Counter : 153