भारतीय निवडणूक आयोग

आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधून लोकसभा निवडणूक 2024 च्या सातव्या टप्प्यासाठी 904 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात


सातव्या टप्प्यासाठी 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 57 लोकसभा मतदारसंघांसाठी 2105 उमेदवारी अर्ज दाखल

Posted On: 22 MAY 2024 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मे 2024

 

1 जून 2024 रोजी मतदान होणाऱ्या, 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील,सातव्या टप्प्यातील लोकसभा 2024 निवडणुकीसाठी एकूण 904 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील लोकसभा निवडणूक 2024 मधील 57 लोकसभा मतदारसंघांसाठी एकूण 2105 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या सर्व 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सातव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 14 मे 2024 होती. दाखल केलेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर, 954 उमेदवारी अर्ज वैध असल्याचे आढळले.

सातव्या टप्प्यात, पंजाबमध्ये 13 लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक 598 उमेदवारी अर्ज आले होते, त्याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये 13 लोकसभा मतदारसंघातून 495 उमेदवारी अर्ज आले होते. बिहारमधील 36 -जेहानाबाद लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 73 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले, त्याखालोखाल पंजाबमधील 7-लुधियाना लोकसभा मतदारसंघात 70 उमेदवारी अर्ज दाखल झाले. सातव्या टप्प्यासाठी लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांची सरासरी संख्या 16 आहे.

लोकसभा निवडणूक 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

Sl. No.

State/UT

Number of PCs in 7th Phase

Nomination forms received

Valid candidates after scrutiny

After withdrawal, final Contesting Candidates

 
 

1

Bihar

8

372

138

134

 

2

Chandigarh

1

33

20

19

 

3

Himachal Pradesh

4

80

40

37

 

4

Jharkhand

3

153

55

52

 

5

Odisha

6

159

69

66

 

6

Punjab

13

598

353

328

 

7

Uttar Pradesh

13

495

150

144

 

8

West Bengal

9

215

129

124

 

 

Total

57

2105

954

904

 

 

* * *

S.Patil/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021315) Visitor Counter : 109