भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

बारामुल्ला मतदारसंघाची गेल्या 8 लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक मतदानाच्या दिशेने आगेकूच ; संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.21% मतदानाची नोंद

Posted On: 20 MAY 2024 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मे 2024

जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील श्रीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये  38.49% इतक्या  विक्रमी मतदानानंतर, बारामुल्ला लोकसभा मतदारसंघ आता गेल्या 8 लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक मतदानाच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे. बारामुल्ला, कुपवाडा, बांदीपोरा आणि बडगाम जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.21 % मतदान झाले.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह  निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी नागरी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि जम्मू-काश्मीरच्या मतदारांच्या उत्साही सहभागाबद्दल आभार मानले.  जम्मू आणि काश्मीरमधील लोक मतदानाचा हक्क बजावण्यास  आणि लोकशाही शासन व्यवस्थेत सहभागी होण्यास उत्सुक आहेत असा स्पष्ट संदेश यातून दिला आहे असे ते म्हणाले.

बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातील 2103 मतदान केंद्रांवर मतदान झाले ज्याचे मतदान केंद्रांवर लाईव्ह  वेबकास्टिंग करण्यात आले.

Gross Voter Turnout in past few elections

PC/Year

2019

2014

2009

2004

1999

1998

1996

1989

Baramulla

34.6%

39.14%

41.84%

35.65%

27.79%

41.94%

46.65%

5.48%

Srinagar

14.43%

25.86%

25.55%

18.57%

11.93%

30.06%

40.94%

Uncontested

 

मतदान केंद्रांवर मतदारांचे स्वागत शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात व्हावे यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. आयोगाने दिल्ली, जम्मू आणि उधमपूरमधील विविध मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्या काश्मिरी स्थलांतरित मतदारांना निर्धारित  विशेष मतदान केंद्रांवर वैयक्तिकरित्या मतदान करण्याचा किंवा टपाल मतपत्रिका वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. जम्मू येथे 21, उधमपूर येथे 1 आणि दिल्ली येथे 4 विशेष मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती .

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2021158) Visitor Counter : 101