भारतीय निवडणूक आयोग

लोकसभा निवडणूक 2024 दरम्यान आदर्श आचारसंहिता लागू झाल्याला दोन महिने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून दुसरा अहवाल


90% पेक्षा जास्त तक्रारींचे निराकरण : काँग्रेस आणि भाजप वगळता इतर पक्षांकडील कोणतीही मोठी तक्रार प्रलंबित नाही

Posted On: 14 MAY 2024 7:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मे 2024

निवडणूक आयोगाने, पारदर्शकता आणि खुलेपणा यांच्या दृढ वचनबद्धतेनुसार, आदर्श आचारसंहिता (एमसीसी) लागू झाल्याला दोन महिने पूर्ण झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या तक्रारींवर आधारित, एमसीसी अंतर्गत केलेल्या कारवाईची स्थिती अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयोगाने ही माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन सर्वात महत्वाचे भागधारक मतदार आणि राजकीय पक्षांना  समतोलता राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची वास्तविक वेळेत माहिती मिळेल, ज्याचा संपूर्ण भारताला योग्य अभिमान आहे.

सुरुवातीला, आयोगाने राजकीय पक्षांच्या, विशेषत: प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून, ज्यांपैकी बहुतेक स्टार प्रचारक आहेत, त्यांनी सध्याच्या निवडणुकांमध्ये त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या प्रचार भाषणांमधून चांगली उदाहरणे मांडण्याची अपेक्षा केली आहे.  देशाच्या नाजूक समतोल सामाजिक जडणघडणीला कायमची ठेच लागू नये म्हणून उर्वरित टप्प्यांमध्ये त्यांची  विधाने/बोल  सुधारणे ही मुख्यतः त्यांची जबाबदारी आहे.

एमसीसी च्या अंमलबजावणीच्या दोन महिन्यांत घेतलेले काही निर्णय खालीलप्रमाणे आहेत:

  1. आदर्श संहिता 16 मार्च 2024 रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या घोषणेसह लागू झाली आणि निवडणुकीचे चार टप्पे संपले.
  2. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून आता दोन महिने पूर्ण झाले असताना, विविध राजकीय पक्ष आणि मतदारसंघ स्तरावरील उमेदवारांचा प्रचार मोठ्या प्रमाणात हिंसामुक्त, कमी गोंगाट, कमी गोंधळ आणि प्रलोभन आणि दिखाऊपणापासून मुक्त राहिला आहे.
  3. भारतीय निवडणूक आयोग मतदारांच्या उत्साहपूर्ण सहभागासह शांततापूर्ण, प्रलोभनमुक्त निवडणुका पार पाडण्याच्या मुख्य कार्यप्रणालीबद्दल मोठ्या प्रमाणावर समाधानी आहे.
  4. चौथ्या टप्प्यापर्यंत देशभरात उत्साहपूर्ण आणि उत्सवाच्या वातावरणात शांततापूर्ण मतदान झाले आहे. आयोगाने नागरिकांना भारतीय निवडणुकांची झलक खास तयार केलेल्या फोटो गॅलरीत पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे: https://www.eci.gov.in/ge-2024-photogallery
  5. आतापर्यंत, 16 राजकीय पक्षांच्या 25 शिष्टमंडळांनी आदर्श संहितेच्या कथित उल्लंघनाबाबत त्यांच्या तक्रारी/तक्रार मांडण्यासाठी आयोगाची भेट घेतली आहे. याशिवाय अनेक शिष्टमंडळे राज्यांमध्ये मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटली आहेत.
  6. सर्व राजकीय पक्षांना त्यांनी अत्यंत कमी वेळेत सूचना दिलेल्या असताना सुद्धा तत्परतेने वेळ देण्यात आला आहे आणि त्यांच्या तक्रारी शांततेने ऐकल्या आहेत.
  7. भारतीय निवडणूक आयोग आणि मुख्य  निवडणूक अधिकारी यांच्या  स्तरावर विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी प्रचाराशी संबंधित किंवा स्पष्टीकरणात्मक तक्रारी वगळता सुमारे 425 प्रमुख तक्रारी दाखल केल्या आहेत.  त्यापैकी 400 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे किंवा प्रकरण निकाली काढण्यात आली आहे.  सुमारे   170, 95 आणि 160 तक्रारी अनुक्रमे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षांनी दाखल केल्या होत्या.  यातील बहुतांश तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे.
  8. जातीय, धार्मिक, प्रादेशिक भाषा किंवा भारतीय राज्यघटनेच्या पावित्र्याबद्दल शीर्ष स्टार प्रचारकांच्या दुही कारक  विधानांच्या संदर्भात  आदर्श आचारसंहिता आणि इतर गोष्टींचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या काँग्रेस आणि भाजप यांच्या परस्पराविरोधातल्या काही तक्रारी प्रलंबित आहेत.

 

N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 2020610) Visitor Counter : 113