भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 695 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात


पाचव्या टप्प्यात 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 49 मतदारसंघांसाठी 1586 उमेदवारी अर्ज

Posted On: 08 MAY 2024 5:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मे 2024

लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 695 उमेदवार निवडणुकीला उभे राहिले आहेत. या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 49 मतदारसंघांसाठी 1586 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख 3 मे 2024 होती. आलेल्या सर्व अर्जांच्या छाननीनंतर 749 अर्ज वैध ठरले आहेत.

पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात 13 लोकसभा मतदारसंघांमधून सर्वाधिक 512 उमेदवारी अर्ज आले. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशातील 14 मतदारसंघांमधून 466 अर्ज दाखल झाले. झारखंडमधील 4-छत्र लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त 69 अर्ज; तर त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशातील 35-लखनौ मतदारसंघात 67 उमेदवारी अर्ज दाखल झाले. पाचव्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची प्रति मतदारसंघ सरासरी संख्या 14 आहे.

लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्याची राज्य/केंद्रशासित प्रदेश-निहाय सविस्तर आकडेवारी –

राज्य/केंद्रशासित प्रदेश

 

मतदारसंघांची संख्या

एकूण उमेदवारी अर्ज

छाननीनंतर वैध उमेदवारांची संख्या

अर्ज मागे घेतल्यानंतर अंतिमतः निवडणूक लढवणार असलेल्या उमेदवारांची संख्या

बिहार

5

164

82

80

जम्मू आणि कश्मिर

1

38

23

22

झारखंड

3

148

57

54

लदाख

1

8

5

3

महाराष्ट्र

13

512

301

264

ओदिशा

5

87

41

40

उत्तर प्रदेश

14

466

147

144

पश्चिम बंगाल

7

163

93

88

Total

49

1586

749

695

 S.Patil/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2019983) Visitor Counter : 166