भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाने सार्वत्रिक निवडणुका 2024 बाबत माहितीसाठी माध्यम सुविधा पोर्टलचा केला प्रारंभ

Posted On: 27 MAR 2024 10:40AM by PIB Mumbai
सार्वत्रिक निवडणुका  2024 साठी वार्तांकन करणाऱ्या माध्यमकर्मींसाठी पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी)  https://pib.gov.in/elect2024/index.aspx ही वन स्टॉप सुविधा पोर्टल स्वरूपात  माइक्रोसाईट सुरू केली आहे.  या सुविधा पोर्टलची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ती पुढीलप्रमाणे :
 
1. डिजिटल फ्लिप बुक : यामध्ये विविध  विश्लेषणे आणि डेटा समृद्ध वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. माध्यमकर्मी आपल्या लेखांसाठी ही माहिती वापरू शकतात. 
 
2. यावर प्रदान करण्यात आलेल्या उपयुक्त लिंक्स अर्थात दुव्यांद्वारे पत्रकार ईसीआयच्या  (भारतीय निवडणूक आयोग ) संकेतस्थळावर संबंधित भाग सुलभपणे शोधू शकतील. 
 
3. संदर्भ म्हणून आणि डेटाचे सुलभ आकलन व्हावे यासाठी  विविध इन्फोग्राफिक्स प्रदान करण्यात आले आहेत. 
 
4. सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या विविध टप्प्यांचे वेळापत्रक पुरवण्यात आले आहे. 
 
5 भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिसूचनांबाबत अद्ययावत माहिती रिअल टाइम बेसिसवर अपलोड केले जातात. 
 
6. सुलभतेसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय ईसीआय अधिकाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे. 
 
7 मीडिया गाईडसह ईसीआयच्या सूचनांचे संकलन सहजरित्या उपलब्ध 
 
8 माध्यमकर्मींना अद्ययावत घडामोडींबाबत अवगत केले जाईल. 
 
***
NM/SonaliK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2016440) Visitor Counter : 366