पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ 29 फेब्रुवारी रोजी मॉरिशसमधील अगालेगा बेटावर नवीन धावपट्टी आणि जेटीचे संयुक्तपणे करणार उद्‌घाटन


आगलेगा बेटावर सहा सामुदायिक विकास प्रकल्पांचेही उद्‌घाटन होणार

या प्रकल्पांमुळे मॉरिशसच्या मुख्य भूमी अगालेगाशी अधिक चांगल्या रीतीने जोडली जाणार असून सागरी सुरक्षा मजबूत होईल

Posted On: 27 FEB 2024 10:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 27 फेब्रुवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान  प्रविंद जुगनाथ 29 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता दूरदृष्यप्रणालीद्वारे मॉरिशसमधील अगालेगा बेटावर सहा सामुदायिक  विकास प्रकल्पांसह नवीन धावपट्टी  आणि सेंट जेम्स जेट्टीचे संयुक्तपणे  उद्‌घाटन करणार आहेत.

भारत आणि मॉरिशस यांच्यातील दृढ आणि अनेक दशके जुन्या विकास भागीदारीची हे प्रकल्प साक्ष पटवतात. मॉरिशसचा मुख्य भूभाग आणि अगालेगा यांच्यातील चांगल्या कनेक्टिव्हिटीची गरज  या प्रकल्पांमुळे पूर्ण होईल. त्यामुळे सागरी सुरक्षा अधिक मजबूत होणार असून सामाजिक-आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. या प्रकल्पांचे उद्‌घाटन महत्त्वपूर्ण आहे कारण 12 फेब्रुवारी 2024 रोजी दोन्ही नेत्यांनी मॉरिशसमध्ये युपीआय आणि RuPay कार्ड सेवा सुरू केल्या होत्या.

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2009606) Visitor Counter : 50