पंतप्रधान कार्यालय
वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
26 FEB 2024 9:07AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“वीर सावरकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली. आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता यांच्याप्रती त्यांची शौर्यपूर्ण उर्जा आणि अविचल समर्पणभाव यांना सारा भारत देश सदैव लक्षात ठेवेल. त्यांचे योगदान आपल्याला आपल्या देशाचा विकास आणि समृद्धी यांच्यासाठी सदैव प्रयत्न करण्याची प्रेरणा देत राहील.”
******
NM/Sanjana C/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2009036)
आगंतुक पटल : 171
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam