पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

प्रविष्टि तिथि: 23 FEB 2024 11:14AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मनोहर जोशी यांनी 2002 ते 2004 या काळात लोकसभेचे अध्यक्ष  म्हणून ही कार्य केले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जोशी यांनी राज्याच्या प्रगतीकरता अथक प्रयत्न केले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तर लोकसभेचे अध्यक्ष म्हणून जोशी यांनी संसदेचे कामकाज अधिक गतिमान करण्यासह त्यात सर्वांचा सहभाग असावा यासाठी प्रयत्न केले, असे ही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्स पोस्ट वर म्हटले आहे:

"मनोहर जोशी जी यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. ते एक जुनेजाणते नेते होते ज्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे सार्वजनिक सेवेसाठी व्यतीत केली आणि महानगरपालिका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध पदांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जोशी यांनी राज्याच्या प्रगतीकरता अथक प्रयत्न केले. तर केंद्रीय मंत्री म्हणून देखील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. लोकसभा अध्यक्षपदाच्या काळात  जोशी यांनी संसदेचे कामकाज अधिक गतिमान आणि सर्वसमावेशक करण्यासाठी  प्रयत्न केले. चारही विधानमंडळांमध्ये काम करण्याचा बहुमान लाभलेले  मनोहर जोशी त्यांच्या व्यासंगाबद्दल स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.  ओम शांती.”

******

Nilima C/Bhakti S /CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2008301) आगंतुक पटल : 180
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Bengali-TR , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam