अर्थ मंत्रालय
“उच्च विकासासोबत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी आणि जनतेला आपल्या आकांक्षांची पूर्तता करता यावी याकरिता अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे”
पंतप्रधान मुद्रा योजना, फंड ऑफ फंड्स, स्टार्ट अप इंडिया आणि स्टार्ट अप क्रेडीट गॅरंटी स्कीम या योजना युवा वर्गात उद्यमशीलतेच्या आकांक्षा निर्माण करत आहेत- केंद्रीय अर्थमंत्री
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2024 1:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 1 फेब्रुवारी 2024
उच्च विकासासोबत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी आणि जनतेला आपल्या आकांक्षांची पूर्तता करता यावी याकरिता अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर करताना केले.
अमृत काळ म्हणजे कर्तव्य काळ
सध्याच्या काळाला कर्तव्य काळाचा प्रारंभ म्हणत सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 75व्या प्रजासत्ताक वर्षात स्वातंत्र्यदिनी केलेल्या संबोधनातील वाक्य उद्धृत केले, “ देश अमाप संधी आणि संभावना खुल्या करत असताना नव्या प्रेरणा, नवा विवेक, नवे संकल्प याद्वारे आम्ही राष्ट्रीय विकासासाठी कटिबद्ध आहोत”
युवावर्गामध्ये उद्यमशीलतेची भावना निर्माण केली जात आहे
पीएम मुद्रा योजने अंतर्गत सुमारे 22.5 लाख कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी दिल्यामुळे आपल्या युवा वर्गात उद्यमशीलतेची भावना निर्माण झाली आहे. त्याशिवाय फंड ऑफ फंड्स, स्टार्ट अप इंडिया आणि स्टार्ट अप क्रेडीट गॅरंटी स्कीम या योजना युवा वर्गाला पाठबळ देत आहेत आणि ते रोजगारदाता देखील बनत आहेत.
M.Jaybhaye/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2001233)
आगंतुक पटल : 199
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
English
,
Assamese
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Telugu
,
Malayalam