पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींनी चंदीगड विद्यापीठाचे कुलगुरू सतनाम सिंग संधू यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

प्रविष्टि तिथि: 30 JAN 2024 3:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 30 जानेवारी 2024

राष्ट्रपतींनी चंदीगड विद्यापीठाचे कुलगुरू सतनाम सिंग संधू यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

एका एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

राष्ट्रपतीजींनी सतनाम सिंग संधू यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केल्याचा मला आनंद झाला आहे. प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि तळागाळातील लोकांची विविध प्रकारे सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून सतनाम जी यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी नेहमीच राष्ट्रीय एकात्मतेसाठी व्यापक काम केले आहे आणि परदेशातील भारतीय समुदायासोबतही काम केले आहे. त्यांच्या संसदीय प्रवासासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की त्यांच्या विचारांनी राज्यसभेचे कामकाज समृद्ध होईल.

@satnamsandhuchd

 

 

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2000605) आगंतुक पटल : 160
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam