शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत मंडपम येथे 29 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या सातव्या आवृत्तीच्या पूर्वतयारीचा धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला आढावा

Posted On: 27 JAN 2024 2:25PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच नवउद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल परीक्षा पे चर्चा 2024’  कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. परिक्षा पे चर्चाकार्यक्रम वार्षिक परंपरा बनला असून परीक्षा योद्धे, पालक आणि शिक्षक असे सर्वजण परिक्षा काळातआपल्याला तणावमुक्त होऊन सर्वोत्तम कामगिरी करता यावी, यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे, प्रधान यांनी सांगितले.

यंदा या कार्यक्रमाच्या सातव्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी MyGov पोर्टलवर विक्रमी 2.26 कोटी नोंदणी झाली आहे. देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये या कार्यक्रमाबद्दल उदंड उत्साह असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरील आयटी पीओ मधील भारत मंडपम येथे 29 जानेवारी 2024 रोजी नियोजित कार्यक्रमात पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी सुमारे 3000 सहभागी उपस्थित राहणार आहेत. कला उत्सवाच्या विजेत्यांसह प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक यांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले आहे. एकलव्य आदर्श निवासी शाळेतील शंभर विद्यार्थी प्रथमच या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

11 डिसेंबर 2023 ते 12 जानेवारी 2024 या अवधीत MyGov पोर्टलवर ऑनलाइन बहु पर्यायी प्रश्न स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रश्नांच्या आधारे या कार्यक्रमातील सहभागी निश्चित करण्यात आले आहेत. निवड झालेल्या सहभागींना पंतप्रधानांनी लिहीलेले "परीक्षा योद्धा" हे पुस्तक आणि प्रमाणपत्रासह परिक्षा पे चर्चासंच मिळणार आहे.

12 जानेवारी ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत देशभरात मॅरेथॉन स्पर्धा, संगीत आणि मिम्स स्पर्धा, नुक्कड नाटक तसेच विद्यार्थी - सुत्रधार - विद्यार्थी - अतिथी चर्चा अशा विविध शाळा-स्तरीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  23 जानेवारी 2024 रोजी, 774 जिल्ह्यांतील 657 केंद्रीय विद्यालये आणि 122 नवोदय विद्यालयांमध्ये "परीक्षा योद्धा" या पुस्तकातील परीक्षा मंत्र या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 60 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले.

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2000027) Visitor Counter : 132