पंतप्रधान कार्यालय
श्री कर्पुरी ठाकुर यांना भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2024 10:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2024
सामाजिक न्यायाचे प्रणेते, दिवंगत नेते, कर्पूरी ठाकुर यांना भारतरत्न (मरणोत्तर) जाहीर झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कर्पूरी ठाकुर यांच्या जन्मशताब्दीमध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याच्या निर्णयामुळे देशवासियांच्या मनात अभिमान जागृत होईल. मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी आणि वंचितांच्या कल्याणाप्रती त्यांची अविचल वचनबद्धता आणि दूरदृष्टीने परिपूर्ण असे त्यांचे नेतृत्व यांनी भारताच्या सामाजिक-राजकीय परिप्रेक्ष्यावर अमीट ठसा उमटवला आहे.
पंतप्रधान एक्स या समाजमाध्यमावर म्हणतात;
“सामाजिक न्यायाचे अग्रदूत महान जननायक आदरणीय कर्पूरी ठाकुर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतल्यामुळे मी अतिशय प्रमुदित झालो आहे. त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आलेला हा निर्णय, देशवासियांना गौरवान्वित करून जाईल. मागासवर्गीय आणि वंचित लोकांच्या उद्धारासाठी आदरणीय कर्पूरी यांची अतूट वचनबद्धता आणि त्यांचे दूरदर्शी नेतृत्व यांनी भारताच्या सामाजिक-राजकीय परिप्रेक्ष्यावर अमीट छाप पाडली आहे. हे भारतरत्न म्हणजे त्यांच्या अतुलनीय योगदानाचा विनम्र सन्मान आहे, इतकेच नव्हे तर, यामुळे सामाजिक सौहार्दाला अधिक चालना मिळेल.”
* * *
R.Aghor/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1998981)
आगंतुक पटल : 251
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam