पंतप्रधान कार्यालय
बँकॉक येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी भारतीय दिव्यांग तिरंदाज संघाचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
23 NOV 2023 10:58AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 23 नोव्हेंबर 2023
बँकॉक येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय दिव्यांग तिरंदाज संघाचे अभिनंदन केले आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“बँकॉक येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत मिळवलेला ऐतिहासिक विजय!
नेत्रदीपक कामगिरी करून इतिहासाच्या पानांवर स्वतःचे नाव कोरल्याबद्दल भारतीय दिव्यांग तिरंदाज संघातील लोकोत्तर खेळाडूंचे अभिनंदन!
4 सुवर्णपदकांसह एकूण 9 पदकांची कमाई करत या स्पर्धेत भारतीय पथकातील खेळाडूंनी त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे.
आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक वाटत आहे. यापुढील काळात देखील अशीच अभिमानास्पद कामगिरी त्यांच्या हातून घडो होच सदिच्छा.”
***
Jaydevi PS/Sanjana/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1979009)
आगंतुक पटल : 162
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam