माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारत संकल्प यात्रेला पहिल्या दिवशी मोठा प्रतिसाद


250 हून अधिक ग्रामपंचायतींमधून 1,00,000 हून अधिक नागरिकांनी घेतला सहभाग

पीएम उज्ज्वला योजनेसाठी 21,000 नोंदणी

Posted On: 17 NOV 2023 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023

अतिशय दिमाखदार सुरुवात करत विकसित भारत संकल्प यात्रा पहिल्या दिवशी देशातील 259 ग्रामपंचायतींमधील  एक लाखाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी झारखंडमधल्या खुंटी येथे या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. त्याचसोबत देशभरात लक्षणीय आदिवासी लोकसंख्या असलेल्या विविध ठिकाणांहून एकाच वेळी या व्हॅन्सचा प्रारंभ झाला.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्याच दिवशी अनेकविध कार्यक्रम आणि उपक्रमांची लगबग होती. राष्ट्रीय विकासाच्या सामायिक दृष्टीचे आदानप्रदान करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आणि सक्षमीकरणाच्या गाथा यात गुंफण्यात आल्या होत्या.

केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना आणि धोरणांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि प्रमुख सरकारी योजनांची 100% संपृक्तता साध्य करणे हा यात्रेचा उद्देश आहे. या उद्दिष्टाच्या अनुषंगाने यात्रेच्या पहिल्याच दिवशी 21000 हून अधिक लोकांनी पीएम उज्ज्वला योजनेसाठी नोंदणी केली.

1200 हून अधिक माय भारत स्वयंसेवकांच्या नोंदणीसह 80,000 हून अधिक लोकांनी विकसित भारत प्रतिज्ञा घेतली. या यात्रेने उल्लेखनीय व्यक्तींवर देखील प्रकाशझोत टाकला - यामध्ये 3,448 महिला, 1,475 विद्यार्थी, 495 स्थानिक कलाकार आणि 298 क्रीडापटू आहेत. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेण्यात येऊन प्रेरणादायी व्यक्ती म्हणून त्यांची प्रशंसा करण्यात आली.

विकसित भारत संकल्प यात्रा आयईसी व्हॅनला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी आयोजित उपक्रमांमध्ये लोक उत्साहाने सहभागी झाले. तसेच ऑन-स्पॉट सेवांचा त्यांनी लाभ घेतला. आरोग्य शिबिरांमध्ये 16,000 हून अधिक लोक सहभागी झाले. त्यात 6,000 हून अधिक लोकांची क्षयरोग चाचणी करण्यात आली आणि सिकलसेलबाबत 4500 हून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली.

ड्रोन प्रात्यक्षिकांना मोठा प्रतिसाद
विकसित भारत संकल्प यात्रेने कृषी क्षेत्रातील विकासावर एक प्रदर्शन देखील सादर केले याचा फायदा शेतकरी त्यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी करू शकतात. 120 हून अधिक ड्रोन प्रात्यक्षिके आणि मृदा आरोग्य कार्ड प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली, यामध्ये नैसर्गिक शेती करणार्‍या शेतकर्‍यांशी अत्यंत प्रभावी संवाद साधण्यात आला.


विकसित भारत संकल्प यात्रेने सरकारी पथदर्शी योजनांचा पुरेपूर लाभ सुनिश्चित करण्यासाठी साध्य केलेले टप्पे देखील अधोरेखित केले.


83 ग्रामपंचायतींनी आयुष्मान कार्ड योजनेचा लाभ 100% लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवला आहे , 89 ग्रामपंचायतींनी जलजीवन अभियानाचा तर 97 ग्रामपंचायतींनी जन धन जन योजनेचा पुरेपूर लाभ लाभार्थ्यांना सुनिश्चित केला आहे तसेच 124 ग्रामपंचायतींनी हागणदारी मुक्त + दर्जा प्राप्त केला आहे
या यात्रेमध्ये वैयक्तिक यशोगाथाही मांडण्यात आल्या, यात 200 हून अधिक लाभार्थींनी "मेरी कहानी मेरी जुबानी" म्हणजेच स्वतःच आपली यशोगाथा सादर केली, लाभार्थ्यांच्या जीवनात सरकारच्या पथदर्शी योजनांमुळे झालेल्या परिवर्तनाची ही साक्ष आहे.
लोकांपर्यंत पोहोचण्याचा विकसित भारत संकल्प यात्रा हा भारत सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा उपक्रम आहे. सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीकोनावर आधारित, सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा पुरेपूर लाभ पोहोचवून सरकारी योजनांचे लाभ देशाच्या कानाकोपऱ्यात सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. देशाच्या विकासात सक्रिय भागधारक बनण्यासाठी पोहोच, माहितीचा प्रसार आणि नागरिकांना सक्षम बनवून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही यात्रा महत्त्वपूर्ण पाऊल आहे.


इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनने विकसित केलेल्या पोर्टलवर माहिती, शिक्षण आणि संप्रेषण. (आयईसी) वाहनांद्वारे अंमलात आणलेल्या प्रत्यक्ष स्थळांवरील उपक्रमांची माहिती , लोकांचा सहभाग प्रत्यक्ष वेळेत संकलित केला जातो.

यात्रेची देशभरातील काही छायाचित्रे

लोक कल्याणकारी योजनांची माहिती देणारे साहित्य यावेळी वितरीत करण्तात आले

विकसित भारत संकल्प यात्रा माहिती, शिक्षण आणि संप्रेषण. (आयईसी) वाहन बिहार मधील एका गावात

विकसित भारत संकल्प यात्रेत ड्रोनचे प्रात्यक्षिक

विकसित भारत संकल्प यात्रा माहिती, शिक्षण आणि संप्रेषण. (आयईसी) वाहन ईशान्य भारतातील एका गावात

आसाममधील आरोग्य शिबीर

 

Jaydevi PS/S.Chavan/S.Kakade/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1977637) Visitor Counter : 249