पंतप्रधान कार्यालय
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने आयोजित केलेल्या विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय क्रिकेट संघाचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
15 NOV 2023 10:49PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेच्या विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध भारताने मिळविलेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. श्री मोदींनी अंतिम सामन्यासाठी संघाला शुभेच्छाही दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या X वर पोस्ट केले आहे:
“टीम इंडियाचे अभिनंदन!
भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आणि दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
अप्रतिम फलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीने आमच्या संघाच्या यशावर शिक्कामोर्तब केले.
अंतिम फेरीसाठी शुभेच्छा!”
टीम इंडियाचे अभिनंदन!
भारताने उत्कृष्ट कामगिरी केली आणि दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.
अप्रतिम फलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीने आमच्या संघाने यशावर शिक्कामोर्तब केले.
अंतिम फेरीसाठी शुभेच्छा!
— नरेंद्र मोदी (@narendramodi) 15 नोव्हेंबर 2023
मोहम्मद शमीच्या नेत्रदीपक कामगिरीचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.
त्यानी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे,
" चमकदार वैयक्तिक कामगिरीमुळे आजची उपान्त्य फेरी आणखी खास ठरली आहे
@मोहम्मद शमीचा हा खेळ आणि विश्वचषकातील गोलंदाजी अनेक पिढ्या क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करून राहील.
शमी छानच खेळला!”
चमकदार वैयक्तिक कामगिरीमुळे आजची उपान्त्य फेरी आणखी खास ठरली आहे
@मोहम्मद शमीचा हा खेळ आणि विश्वचषकातील गोलंदाजी अनेक पिढ्या क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करून राहील.
शमी छानच खेळला!
— नरेंद्र मोदी (@narendramodi) 15 नोव्हेंबर 2023
***
JPS/Sampada/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1977297)
आगंतुक पटल : 155
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada