पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी शीतल देवीचे केले अभिनंदन
Posted On:
27 OCT 2023 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, हँगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, तिरंदाजी क्रीडा प्रकारात महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड खुल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शीतल देवी हिचे अभिनंदन केले.
तिचा पराक्रम तिच्या धैर्य आणि दृढनिश्चयाची साक्ष आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, तिरंदाजीमध्ये महिला वैयक्तिक कंपाऊंड खुल्या स्पर्धेत शीतल देवीच्या अद्वितीय सुवर्णपदकाबद्दल अभिमान वाटतो. हे यश तिच्या धैर्य आणि दृढनिश्चयाची साक्ष आहे."
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1972290)
अभ्यागत कक्ष : 159
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam