पंतप्रधान कार्यालय

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या लांब उडी-T64 मध्ये सुवर्णपदकाची कमाई केल्याबद्दल पंतप्रधानांकडून धर्मराज सोलैराज चे अभिनंदन

Posted On: 27 OCT 2023 9:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझोऊ येथे खेळल्या जाणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज पुरुषांच्या लांब उडी-T64 मध्ये सुवर्णपदकाची कमाई केल्याबद्दल धर्मराज सोलैराज चे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"धर्मराज सोलैराजने मारलेली सुवर्ण झेप आणि दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या लांब उडी-T64 मध्ये सुवर्णपदक पटकावल्याबद्दल त्याचे अभिनंदन. भारताला अत्यानंद झाला आहे. त्याने इतिहास घडवला आहे आणि देशाला प्रेरित केले आहे."

Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1972269) Visitor Counter : 54