पंतप्रधान कार्यालय
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेटच्या समावेशाचे पंतप्रधानांनी केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
16 OCT 2023 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2023
लॉस एंजलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2028 मध्ये बेसबॉल-सॉफ्टबॉल, क्रिकेट, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश या खेळांचा समावेश केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश या अद्भुत खेळाची वाढती जागतिक लोकप्रियता दर्शवतो, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
बेसबॉल-सॉफ्टबॉल, क्रिकेट, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश या खेळांचा लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये समावेश करण्यात आल्याबद्दल आनंद झाला. खेळाडूंसाठी ही आनंदाची बातमी आहे. एक क्रिकेटप्रेमी राष्ट्र म्हणून, आम्ही क्रिकेटच्या समावेशाचे विशेष स्वागत करतो, यातून या अद्भुत खेळाची वाढती जागतिक लोकप्रियता दिसून येते.
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1968235)
आगंतुक पटल : 166
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam