पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या  भाषणामध्‍ये केलेल्या घोषणांवर आधारित विविध   योजनांसंदर्भातल्या प्रगतीचा पंतप्रधानांनी  घेतला आढावा


महिलांच्या योजनांकडे विशेष लक्ष : 2 कोटी लखपती दीदी बनवण्याच्या योजनेपासून,  15,000 महिला बचत  गटांना ड्रोनद्वारे सक्षम करण्‍याच्या  योजनेवर केली चर्चा

जनऔषधी दुकानांची संख्‍या 10,000 वरून वाढवून   25,000 करण्याच्या  योजनेवरही काम सुरु 

Posted On: 10 OCT 2023 7:50PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्‍यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत  त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या  भाषणामध्‍ये केलेल्या घोषणांवर आधारित विविध   योजनांसंदर्भातल्या  प्रगतीचा पंतप्रधानांनी   आढावा घेतला.

पंतप्रधानांनी  ‘2 कोटी लखपती दीदीबनवण्याविषयी उल्लेख केला होता.   या योजनेनुसार स्वयंसहाय्यता गट आणि  अंगणवाड्यांशी जोडलेल्या  2 कोटी महिलांना लखपती बनवण्याविषयी त्यांनी भाष्‍य केले होते. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी नियोजित विविध उपजीविका विषयक उपायांचा  त्यांनी आढावा घेतला.

आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी 15,000 महिला बचत गटांना शेती आणि संबंधित कामांसाठी ड्रोनने सुसज्ज करण्याविषयी घोषणा केली होती.  ही योजना लागू करण्याच्या दिशेने  महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्यापासून ते क्रियाकलापांच्या देखरेखीपर्यंतच्या योजनांची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.

सर्व सामान्यांना परवडणा-या दरामध्‍ये औषधांची विक्री  करणाऱ्या  देशभरातील जनऔषधी दुकानांची   संख्या 10,000 वरून   25,000 करण्याबाबतही पंतप्रधानांनी सांगितले होते. या बैठकीमध्‍ये  पंतप्रधानांनी या विस्तार कामाच्या  अंमलबजावणी धोरणाचा आढावा घेतला.

***

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1966478) Visitor Counter : 127