पंतप्रधान कार्यालय
गेल्या 60 वर्षांतील आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा
Posted On:
08 OCT 2023 11:03AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 60 वर्षातील भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील 107 या सर्वोच्च पदकसंख्येसह आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदींनी खेळाडूंच्या अविचल दृढनिश्चयाचे, कठोर जिद्द आणि परिश्रमाचे कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही ऐतिहासिक कामगिरी!
आपल्या अतुलनीय खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वोच्च एकूण 107 पदके मिळवून दिल्याने संपूर्ण देश आनंदित आहे, ही गेल्या 60 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
आपल्या खेळाडूंच्या अविचल दृढनिश्चय, कठोर जिद्द आणि परिश्रमाने देशाचा गौरव वाढविला आहे. त्यांच्या या विजयाने आपल्याला कायमस्वरणात राहतील असे क्षण दिले आहेत, आपल्या सर्वांना प्रेरणा दिली आहे आणि उत्कृष्टतेसाठीच्या आपल्या कटिबद्धतेची पुष्टी केली आहे.”
****
MI/ VPY/CY
Follow us on social media:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai