पंतप्रधान कार्यालय

कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तिरंदाज चमूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 05 OCT 2023 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2023

आशियाई क्रीडा स्पर्धेत, पुरुषांच्या तिरंदाज चमूने, कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी या चमूतील अभिषेक वर्मा, ओजस प्रवीण देवतळे आणि प्रथमेश जावकर यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी  X या समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे:

"भारतीय तिरंदाजांचा सर्वत्र बोलबाला ! कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष तिरंदाजी संघाचा अभिमान देशाला आहे!

@archer_abhishek, ओजस प्रवीण देवतळे आणि प्रथमेश जावकर, या तिघांचीही ही सर्वोत्तम कामगिरी होती. खरंच विलक्षण! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा."

 

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1964845) Visitor Counter : 93