पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 4x400 पुरुष रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले

Posted On: 04 OCT 2023 10:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023

हँगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 4x400 रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल मुहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल आणि राजेश रमेश यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी x संदेशात म्हटले आहे:

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 4x400 रिले स्पर्धेत आपल्या संघाने केलेली कामगिरी अद्वितीय होती.

मोहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मोहम्मद अजमल आणि राजेश रमेश यांनी आपल्या दिमाखदार कामगिरीने भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्याचा अभिमान आहे. त्यांचे अभिनंदन.

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1964407) Visitor Counter : 95