पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय महिलांच्या 4x400 रिले संघाचे केले अभिनंदन

Posted On: 04 OCT 2023 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांच्या 4x400 रिले संघाने रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी विथ्या रामराज, ऐश्वर्या कैलाश मिश्रा, प्राची आणि सुभा व्यंकटेशन यांचे अभिनंदन केले.

एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय महिलांच्या 4x400 रिले संघाचा आम्हाला अभिमान आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विथ्या रामराज, ऐश्वर्या कैलाश मिश्रा, प्राची आणि सुभा व्यंकटेशन यांचे खूप खूप अभिनंदन.त्यांच्या जिद्द,जिद्द आणि संघभावनेमुळे देशाला हा आनंद मिळाला आहे!

 

Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1964391) Visitor Counter : 94