पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महिला मुष्टियुद्धात 75 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले लव्हलिना बोरगोहेनचे अभिनंदन

Posted On: 04 OCT 2023 8:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला मुष्टियुद्धात 75 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लव्हलिना बोरगोहेनचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

लव्हलिना बोरगोहेनने महिलांच्या मुष्टियुद्ध क्रीडा प्रकारात 75 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवून दिल्याबद्दल तिचे अभिनंदन.

कौशल्य आणि तंत्राच्या अपवादात्मक कामगिरीच्या जोरावर तिने आपल्या देशाला उत्सव साजरा करण्याचे एक मोठे कारण दिले आहे. ती अशीच सतत उंच भरारी घेत राहो आणि भारताला गौरव मिळवून देत राहो.

 

Jaydevi PS/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1964345) Visitor Counter : 90