पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नागरिकांना 1 ऑक्टोबर 2023 रोजी होणाऱ्या श्रमदान उपक्रमात सहभागी होण्याचे केले आवाहन
Posted On:
29 SEP 2023 10:12AM by PIB Mumbai
स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून येत्या 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणाऱ्या श्रमदान या स्वच्छताविषयक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना केले आहे.
शहरी भागासाठी राबवल्या जात असलेल्या स्वच्छ भारत उपक्रमातर्फे एक्स मंचावर लिहिलेला संदेश सामायिक करत पंतप्रधान म्हणाले;
“दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता आपण सर्वजण एका महत्त्वाच्या स्वच्छताविषयक उपक्रमासाठी एकत्र येऊया.
स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी केला जाणारा प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. अधिक स्वच्छ भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी या उदात्त उपक्रमात सहभागी व्हा.”
***
S.Thakur/S.Chitnis/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1961916)
Read this release in:
Telugu
,
Malayalam
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada