पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                08 SEP 2023 7:46PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान  भारतात आल्या आहेत.
मोदी यांनी X वर पोस्ट केले
"पंतप्रधान शेख हसीना यांच्याबरोबर फलदायी चर्चा झाली. गेल्या 9 वर्षात भारत-बांग्लादेश संबंधांमध्ये झालेली प्रगती अतिशय आनंददायी आहे. यावेळी कनेक्टिव्हिटी, व्यावसायिक संबंध आणि इतर अनेक मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली."
 
 
पंतप्रधान कार्यालयाने देखील X वर पोस्ट केले आहे.
"पंतप्रधान @narendramodi यांनी भारत-बांग्लादेश द्विपक्षीय सहकार्यामध्ये वैविध्य आणण्याबाबत  पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी फलदायी चर्चा केली. कनेक्टिव्हिटी, संस्कृती तसेच दोन्ही देशांमधील लोकांमधील संबंध यासह अनेक क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्याबाबत त्यांनी  सहमती दर्शवली."
 
***
S.Patil/S.Kane/P.Kor
*** 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1955654)
                Visitor Counter : 201
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam