पंतप्रधान कार्यालय

बुद्धीबळातील ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदने आपल्या कुटुंबियांसह पंतप्रधानांची घेतली भेट

Posted On: 31 AUG 2023 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑगस्ट 2023

 

बुद्धीबळातील ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदने आपल्या कुटुंबियांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज 7 लोक कल्याण मार्ग इथे भेट घेतली.

प्रज्ञानानंदच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे;

“आज 7, लोक कल्याण मार्ग इथे खूप खास पाहुणे आले होते.

@rpragchess तुझ्या कुटुंबियांसह तुला भेटून आनंद झाला.

तू जिद्द आणि चिकाटीचे मूर्तिमंत रूप आहेस भारतीय युवक कोणतेही क्षेत्र जिंकू शकतात, याचे तू प्रत्यक्ष उदाहरण आहेस. आम्हाला तुझा सार्थ अभिमान वाटतो!"

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1953891) Visitor Counter : 112