पंतप्रधान कार्यालय
गेल्या 9 वर्षांत सौरऊर्जा क्षमतेत 54 पटीने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर मिशन नेट झिरो मधील प्रगतीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
29 AUG 2023 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन नेट झिरो दिशेने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
गेल्या 9 वर्षांत सौर क्षमता 54 पट वाढली आहे असे रेल्वेने X वर पोस्ट केले होते. मार्च 2014 पर्यंत स्थापित सौर उर्जा क्षमता 3.68 मेगावॅट होती तर 2014-23 या कालावधीत 200.31 मेगावॅट सौर ऊर्जा स्थापित करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली.
यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले:
"हरित भविष्याप्रति आपल्या वचनबद्धतेत प्रशंसनीय प्रगती झाल्याचे हे दर्शवते. केवळ 9 वर्षात, आपण #MissionNetZero कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती करत आपली क्षमता लक्षणीयरीत्या वाढवली आहे. भारतासाठी उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य सुनिश्चित करणारा हा प्रवास असाच पुढे चालू ठेवूया."
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1953390)
Visitor Counter : 175
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam