पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी स्मृती वन उद्घाटन दिवसाच्या आठवणींना दिला उजाळा
कच्छमधील स्मृती वनला भेट देण्याचे जनतेला केले आवाहन
Posted On:
29 AUG 2023 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2023
2001 च्या गुजरात भूकंपात प्राण गमावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून उभारण्यात आलेल्या स्मृती वन उद्घाटन दिवसाच्या आठवणींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उजाळा दिला आहे.
गेल्या वर्षी स्मृतीवनचे उद्घाटन करतानाची काही क्षणचित्रे मोदी यांनी सामायिक केली आहेत.
त्यांनी कच्छमधील स्मृतीवनला भेट देण्याचे सर्वांना आवाहनही केले आहे.
मोदी स्टोरीच्या एक्स पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले;
“आपल्याला 2001 च्या गुजरात भूकंपात प्राण गमावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून उभारण्यात आलेल्या स्मृती वनचे उद्घाटन करून एक वर्ष झाले आहे.हे स्मारक लवचिकता आणि स्मृती दर्शवते.गेल्या वर्षीची काही क्षणचित्रे सामायिक करत आहे आणि मी तुम्हा सर्वांना कच्छमधील स्मृती वनला भेट देण्याचे आवाहन करतो...”
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1953386)
Visitor Counter : 134
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam