पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नागरिकांना 'हर घर तिरंगा' अंतर्गत तिरंगा ध्वजासह ‘सेल्फी’अपलोड करण्याचे केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
11 AUG 2023 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' या मोहिमेअंतर्गत नागरिकांना harghartiranga.com या संकेतस्थळावर तिरंगा ध्वजासोबतचे आपले छायाचित्र अपलोड करण्याचे आवाहन केले आहे.
ट्विटच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
"हर घर तिरंगा अभियानामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये एक नवीन चैतन्य, ऊर्जा भरली गेली आहे. देशवासियांनो, यावर्षी हे अभियान एका नवीन उंचीवर घेऊन जायचे आहे. चला तर मग, 13 ते 15ऑगस्ट या कालावधीमध्ये देशाचा ‘मान, सन्मान आणि अभिमान’यांचे प्रतीक असलेला राष्ट्रीय ध्वज घरोघरी फडकविण्यात यावा. तिरंगा ध्वजाबरोबर सेल्फी काढून तो harghartiranga.com या संकेतस्थळावर सर्वांनी जरूर अपलोड करावा."
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1947997)
आगंतुक पटल : 195
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam