पंतप्रधान कार्यालय
बिनीचे उद्योजक एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट
Posted On:
21 JUN 2023 10:53AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2023
अमेरिकेतील आघाडीचे उद्योजक, तंत्रज्ञान क्षेत्रातील धुरीण, टेस्ला आयएनसी आणि सस्पेसएक्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी, सीटीओचे मालक, ट्वीटरचे अध्यक्ष, बोरिंग कंपनी आणि एक्स कॉर्पचे संस्थापक, नौरालिंक आणि ओपन एआय चे सह-संस्थापक एलॉन मस्क यांनी आज न्यूयॉर्क इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
विविध क्षेत्रात तंत्रज्ञान सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करुन देण्यासाठी, एलॉन मस्क यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. मस्क यांनी भारतातील विविध संधींचा लाभ घ्यावा, तसेच इलेक्ट्रॉनिक मोबिलिटी आणि वेगाने विस्तारणाऱ्या व्यावसायिक अवकाश क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे आमंत्रण पंतप्रधानांनी त्यांना दिले.
* * *
R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1933852)
Visitor Counter : 172
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam