पंतप्रधान कार्यालय
आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिनानिमित्त पंतप्रधानांनी संग्रह करण्याच्या महत्त्वावर दिला भर
प्रविष्टि तिथि:
09 JUN 2023 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला समृद्ध वारसा आणि ज्ञान जतन करण्यासाठी योग्य संग्रह करण्याची गरज आणि भूमिका अधोरेखित केली आहे.
आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिनानिमित्त भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार संस्थेने आयोजित केलेल्या प्रदर्शनासंबंधी एका ट्विट संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"योग्यरित्या संग्रह राखणे हा आपला समृद्ध वारसा आणि ज्ञान जतन करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. संग्रह करणे हे सुनिश्चित करते की भविष्यातील पिढ्या भूतकाळाशी संबंध जोडू शकतील आणि आमच्या सामूहिक बुद्धिमत्तेची वृद्धी कायम राखू शकतील. राष्ट्रीय इतिहासाचे परिश्रमपूर्वक रक्षण करणार्या अभिलेखागारांना आपल्या हृदयात जतन करू या."
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1931173)
आगंतुक पटल : 170
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam