पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ऑस्ट्रेलियाच्या विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

Posted On: 24 MAY 2023 11:42AM by PIB Mumbai

ऑस्ट्रेलियाचे विरोधी पक्षनेते पीटर डटन यांनी 24 मे 2023 रोजी सिडनी  येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भारत-ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला मिळालेल्या भक्कम द्विपक्षीय समर्थनाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
दोन्ही देशांमधील लोकांच्या परस्पर संबंधांबरोबरच द्विपक्षीय भागीदारीच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. तसेच प्रादेशिक घडामोडींवरही यावेळी चर्चा झाली.

***


Jaydevi/Sushama/CYadav

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1926853) Visitor Counter : 154