पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 16 मे 2023 रोजी रोजगार मेळाव्याअंतर्गत शासकीय सेवेत नव्याने भरती झालेल्या सुमारे 71,000 उमेदवारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, नियुक्ती पत्र वितरीत करणार
Posted On:
15 MAY 2023 4:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 16 मे 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता, शासकीय सेवेत नव्याने भरती झालेल्या सुमारे 71,000 उमेदवारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, नियुक्ती पत्र वितरीत करणार आहेत. यावेळी पंतप्रधान या उमेदवारांना संबोधितही करणार आहे.
देशभरात एकूण 45 ठिकाणी हा रोजगार मेळावा होणार आहे. केंद्र सरकारचे विभाग तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही भरती होत आहे. या नव्या भरतीअंतर्गत देशभरातून नव्याने निवड झालेले हे उमेदवार, ग्रामीण टपाल सेवक, टपाल निरीक्षक, वाणिज्य तथा तिकीट लिपिक, कनिष्ठ लिपिक तथा टंकलेखक, कनिष्ठ लेखा लिपिक, ट्रॅक मेंटेनर, सहाय्यक विभाग अधिकारी, कनिष्ठ विभाग लिपिक, उपविभागीय अधिकारी, कर सहाय्यक, सहाय्यक सक्तवसुली अधिकारी, निरीक्षक, नर्सिंग अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, फायरमन, सहाय्यक लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, विभागीय लेखापाल, लेखापरीक्षक, कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट कमांडंट, प्राचार्य, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, सहाय्यक निबंधक, सहाय्यक प्राध्यापक या आणि अशा विविध पदांवर रुजू होणार आहेत.
हा रोजगार मेळावा म्हणजे, रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शवलेल्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले नवे पाऊल आहे. या रोजगार मेळाव्यांमुळे भविष्यातील रोजगार निर्मितीला चालना मिळू शकेल आणि युवा वर्गाच्या सक्षमीकरणाच्यादृष्टीने तसेच राष्ट्रीय विकासााच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा यादृष्टीने त्यांना गुणवत्तापूर्ण संधी मिळू शकतील अशी अपेक्षा आहे.
नव्याने भरती झालेल्या या उमदवारांना, कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून सेवेच्या माध्यमातून सेवेविषयी प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. शासकीय सेवेत, नव्याने नियुक्त्य होणाऱ्या सर्व उमेदवारांना या अभ्यासक्रमाअंतर्गत प्रशिक्षण दिले जाते.
* * *
Jaydevi PS/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1924198)
Visitor Counter : 234
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam