पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

सीबीएसई बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्‍यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 12 MAY 2023 4:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मे 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बारावीच्या परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या सर्व #ExamWarriors चे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट मालिकेत म्हटले आहे:

"सीबीएसई बारावीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या सर्व #ExamWarriors चे मी अभिनंदन करतो. या तरुणांच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा मला अभिमान आहे. या तरुणांच्या यशामध्‍ये  महत्त्वाची भूमिका बजावणारे   त्यांचे पालक आणि शिक्षक यांचेही मी  अभिनंदन करतो.

बारावीच्या परीक्षेत आपण अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो, असे ज्या तरुणांना वाटत आहे, त्यांना मला सांगायचे आहे- आगामी काळात तुम्हाला खूप काही करता येण्याजोगे आहे. एक परीक्षा तुमचे मूल्यमापन करू शकत नाही. आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्यातील प्रतिभेचा वापर करा. तुम्ही दिमाखदार कामगिरी कराल!

 S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923676) Visitor Counter : 125