पंतप्रधान कार्यालय
प्रकाश सिंग बादल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
25 APR 2023 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2023
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.
या संदर्भात केलेल्या ट्वीट मालिकेत पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“प्रकाश सिंग बादल जी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून तीव्र दु:ख झाले.ते भारतीय राजकारणातील एक जेष्ठ व्यक्तिमत्त्व आणि एक सन्माननीय राजनीतीज्ञ होते ज्यांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले. पंजाबच्या प्रगतीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि अत्यंत कठीण काळात समर्थपणे राज्याची धुरा सांभाळली.
प्रकाशसिंग बादल यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी अनेक दशके त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधला आहे आणि त्यांच्याकडून खूप काही शिकलोही आहे. मला आमची असंख्य संभाषणे आठवतात. त्यांच्या बोलण्यातून त्यांचा समंजसपणा नेहमीच स्पष्टपणे जाणवत असे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांप्रती मी माझ्या शोकभावना व्यक्त करतो. ”
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1919671)
आगंतुक पटल : 169
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam