पंतप्रधान कार्यालय
गुवाहाटी एम्स बाबतच्या नागरिकांच्या प्रतिक्रियांना पंतप्रधानांनी दिला प्रतिसाद
Posted On:
15 APR 2023 9:51AM by PIB Mumbai
गुवाहाटी एम्स रुग्णालया संदर्भातल्या पंतप्रधानांच्या ट्विटला प्रतिसाद देणाऱ्या अनेक नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला.
राजेश भारतीय यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले,
" एम्स (AIIMS) रुग्णालयांच्या सुविधेचा विस्तार करणे हा एक अतिशय समाधानकारक उपक्रम आहे आणि आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि स्वस्त करण्यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करू."
प्राध्यापक (डॉ) सुधीर दास यांच्या ईशान्येकडील सुपर स्पेशालिटी उपचारांच्या उपलब्धतेबद्दलच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले,
"होय, ही सुविधा माझ्या ईशान्येकडच्या बंधू आणि भगिनींना खूप मदत करेल."
जोरहाट येथील रहिवासी दीपंकर पाराशर यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले,
"नव्याने सुरु झालेल्या या सुविधांमुळे आणि पायाभरणी झालेल्या कामांमुळे आसामच्या विकासाच्या वाटचालीला आणखी चालना मिळेल."
***
S.Thakur/V.Yadav/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1916759)
Visitor Counter : 198
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam