पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जन जागृती आणि लोकसहभागातून कुपोषणाची समस्या हाताळण्यासंदर्भात ओदिशातील बालनगीर मधील खासदारानी केलेली ट्विट मालिका पंतप्रधानांनी केली सामायिक

Posted On: 10 APR 2023 12:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशातील बालनगीर येथील खासदार संगीता कुमारी सिंग देव यांनी कुपोषणाच्या समस्येची जनजागृती व जनसहभागाच्या माध्यमातून हाताळणी करण्यासंदर्भातल्या ट्विट मालिकेला प्रतिसाद दिला आहे.  

सरकारने महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या पोषण अभियान अंतर्गत सुरु केलेल्या उपक्रमामुळे झालेल्या सकारात्मक परिणामांबद्दल बालनगीरच्या खासदारांनी या ट्विट थ्रेड मालिकेत  माहिती दिली. या पोषण अभियानामुळे बालके आता जन्मतः च अधिक निरोगी व सुपोषित असतात अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानासाठी दिलेल्या हाकेला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला असून पंतप्रधानांच्या या आवाहनाशी लोक  जोडले गेले असे त्या म्हणाल्या . सरकारने  पोषण अभियानाची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने केल्यामुळे व त्याला जनतेकडून सक्रिय सहभाग मिळाल्यामुळे ते यशस्वी होत आहे असे त्या म्हणाल्या . 

पंतप्रधानांनी त्यावर ट्वीट दिले -

“कुपोषणाची समस्या जनजागृती व जनसहभागातून सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसंबंधात ही  एक खूप विचारप्रवर्तक ट्वीट  मालिका आहे.” 

 

 

* * *

N.Chitale/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1915252)