पंतप्रधान कार्यालय
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
29 MAR 2023 6:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मार्च 2023
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
ट्विटच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
“गिरीश बापट जी हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते, ज्यांनी समाजाच्या सेवेसाठी परिश्रम घेतले. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात काम केले विशेषतः पुण्याच्या विकासाची त्यांना तळमळ होती. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”
“गिरीश बापट जी यांनी महाराष्ट्रात भाजपच्या उभारणीत आणि पक्ष मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावली. ते एक सहज भेट घेता येण्याजोगे आमदार होते, ज्यांनी लोक कल्याणाचे प्रश्न मांडले. एक प्रभावी मंत्री म्हणून, आणि नंतर पुण्याचे आमदार म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांचे चांगले कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील.”
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1911945)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam