पंतप्रधान कार्यालय

ऍस्ट्रो नाईट स्काय टूरिझमला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी केले कौतुक

Posted On: 29 MAR 2023 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मार्च 2023

 

ऍस्ट्रो नाईट स्काय टूरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी  गोवा सायन्स सेंटर आणि प्लॅनेटेरियम करत असलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. दुर्बिणीद्वारे रात्रीचे आकाश पाहण्याचा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी मिरामार समुद्रकिनारी लोकांची गर्दी होत आहे.

नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्सचे ट्विट शेअर करत पंतप्रधानांनी ट्विट केले;

“अशा प्रयत्नांना वेग आलेला पाहून आनंद झाला. काही वर्षांपूर्वी ‘मन की बात’ मध्ये मी खगोलशास्त्रातील भारताच्या समृद्ध वारशाबद्दल बोललो होतो. “

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1911879) Visitor Counter : 133