पंतप्रधान कार्यालय
बंगळुरू मेट्रोच्या व्हाईटफील्ड (कडुगोडी) ते कृष्णराजपुरा मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
पंतप्रधानांनी केला मेट्रोने प्रवास
प्रविष्टि तिथि:
25 MAR 2023 3:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मार्च 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरू मेट्रोच्या व्हाईटफिल्ड (कडुगोडी) ते कृष्णराजपुरा मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले. तसेच नव्याने उद्घाटन केलेल्या मेट्रोमधून त्यांनी प्रवासही केला.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे की:
"पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू येथील मेट्रोमध्ये बसून, विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधत आहेत."
व्हाईटफिल्ड (कडुगोडी) मेट्रो स्थानकावर आल्यावर पंतप्रधानांनी प्रथम तिकीट खिडकीवर तिकीट खरेदी केले आणि त्यानंतर या प्रसंगी आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर पंतप्रधानांनी व्हाईट फील्ड मेट्रो लाईनच्या उद्घाटनाच्या फलकाचे अनावरण केले आणि मेट्रोमध्ये चढण्यासाठी ते प्लॅटफॉर्मकडे निघाले. प्रवासादरम्यान त्यांनी बेंगळुरू मेट्रोच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
पंतप्रधानांच्या समवेत कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उपस्थित होते.
पार्श्वभूमी
जागतिक दर्जाच्या शहरी गतिशील पायाभूत सुविधा देशभरात निर्माण करून विकास साधण्यावर पंतप्रधानांचा विशेष भर आहे. या अनुषंगाने, व्हाईटफील्ड (कडुगोडी) मेट्रो ते कृष्णराजपुरा या 13.71 किमी लांबीच्या बंगळुरू मेट्रो टप्पा - 2 अंतर्गत रीच-1 विस्तार प्रकल्पाच्या 13.71 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते व्हाईटफील्ड (कडुगोडी) मेट्रो स्टेशन येथे उदघाटन करण्यात आले. सुमारे 4250 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या, या मेट्रो मार्गामुळे बंगळुरूमधील प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवास सुविधा मिळतील, तसेच प्रवास जलदगतीने आणि सुखद होऊन शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल.
* * *
S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1910714)
आगंतुक पटल : 181
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam