पंतप्रधान कार्यालय
ईशान्य प्रदेशात 21 मार्च 2023 रोजी भारत गौरव ट्रेन सुरू होणार असल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
06 MAR 2023 8:09PM by PIB Mumbai
ईशान्य भागात 21 मार्च 2023 रोजी भारत गौरव ट्रेन सुरू होणार असल्याबद्दल पंतप्रधान,नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा एक रंजक आणि संस्मरणीय प्रवास असेल, ईशान्येचा धांडोळा घेण्याची एक अनोखी संधी असेल असे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय रेल्वेने "नॉर्थ ईस्ट डिस्कव्हरी: बियॉन्ड गुवाहाटी" अर्थात “गुवाहाटी पल्याड ईशान्येकडील शोध” ही गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे, भारत गौरव डिलक्स वातानुकूलित प्रवासी ट्रेनद्वारे भारतातील ईशान्येकडील राज्ये पाहण्यासाठी याची खास आखणी करण्यात आली आहे. ही गाडी 21 मार्च 2023 रोजी दिल्ली सफदरजंग रेल्वे स्थानकावरून रवाना होईल आणि 15 दिवसांत गुवाहाटी, शिवसागर, आसाममधील जोरहाट आणि काझीरंगा, त्रिपुरामधील उनाकोटी, अगरतळा आणि उदयपूर, नागालँडमधील दिमापूर आणि कोहिमा आणि मेघालयातील शिलाँग आणि चेरापुंजी यांची सफर घडवेल.
आगामी भारत गौरव ट्रेनच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री जी किशन रेड्डी यांच्या ट्विट संदेशाला उत्तर देताना, पंतप्रधानांन ट्विट संदेशात म्हणाले;
"हा एक मनोरंजक आणि संस्मरणीय प्रवास असेल, ईशान्येचा धांडोळा घेण्याची एक अनोखी संधी असेल."
***
Nilima C/Vasanti/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1904720)
Visitor Counter : 193
Read this release in:
Kannada
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam