पंतप्रधान कार्यालय
जागतिक रेडीओ दिनानिमित्त रेडीओच्या सर्व श्रोत्यांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
26 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाबाबत शिफारसी सामायिक करण्याचे नागरिकांना केले आवाहन
Posted On:
13 FEB 2023 9:00AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या जागतिक रेडीओ दिनानिमित्त रेडीओ ऐकणारे सर्व श्रोते, रेडीओ जॉकीज तसेच प्रसारण यंत्रणेशी संबंधित सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्वांनी 26 फेब्रुवारी2023 रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आपल्या शिफारसी तसेच सूचना सामायिक कराव्या, असे आवाहन देखील पंतप्रधानांनी केले आहे.
ट्विट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
“रेडीओचे सर्व श्रोतेजन, रेडीओ जॉकीज तसेच प्रसारण यंत्रणेशी संबंधित सर्वांना जागतिक रेडीओ दिनाच्या शुभेच्छा. अभिनव प्रकारच्या कार्यक्रमांचे प्रसारण करून रेडीओ सामान्यजनांचे जीवन उजळत राहो आणि मानवी सर्जनशीलतेचे दर्शन घडवत राहो हीच सदिच्छा.”
“आजच्या जागतिक रेडीओ दिनाच्या निमित्ताने मी तुम्हां सर्वांना या महिन्यात 26 तारखेला सादर होणाऱ्या 98 व्या #MannKiBaat कार्यक्रमाची आठवण करून देऊ इच्छितो. या कार्यक्रमासाठी तुम्ही तुमच्या सूचना सामायिक कराव्या ही विनंती. मायगव्ह, नमो ॲप यांच्या माध्यमातून अथवा 1800-11-या क्रमांकावर फोन करून तुमचे संदेश रेकॉर्ड करून तुम्ही तुमच्या सूचना कळवू शकता.”
S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1898743)
Visitor Counter : 140
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam