पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी गेल्या महिन्याच्या मन की बात कार्यक्रमावर आधारित पुस्तिका केली सामायिक
प्रविष्टि तिथि:
24 DEC 2022 9:45AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात झालेल्या मन की बात कार्यक्रमावर (नोव्हेंबर2022) आधारित एक पुस्तिका सामायिक केली आहे. भारताकडे आलेले जी 20 समूहाचे अध्यक्षपद, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताने सातत्याने घेतलेली गरूड-भरारी, सांगितिक वाद्यांच्या निर्यातीत झालेली वृद्धी आणि आणखी काही विषयांचा त्यात समावेश आहे.
पंतप्रधानांनी यासंदर्भात ट्विट संदेशात म्हटले आहे की, गेल्या महिन्याच्या मन की बात कार्यक्रमात ज्या विषयांचा समावेश होता, त्यावर आधारित ही ई पुस्तिका असून त्यात भारताचे जी 20 समूहाचे अध्यक्षपद, आमची अंतराळ संशोधन क्षेत्रात सातत्याने सुरू असलेली भरारी, संगीताच्या वाद्यांच्या निर्यातीत होत असलेली वाढ आणि इतर कित्येक मनोरंजक विषयांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे ही ई पुस्तिका आवर्जून वाचा, असे आवाहन मी करतो.
http://davp.nic.in/ebook/h_nov/index.html"
****
M.Chopade/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1886248)
आगंतुक पटल : 222
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam