माहिती आणि प्रसारण मंत्रालय
युट्युब वरील खोट्या माहितीसंदर्भात केंद्र सरकारने केला प्रहार
खोट्या बातम्या पसरवणारी तीन यूट्यूब चॅनेल्स पीआयबीच्या फॅक्ट चेक विभागाने उघडकीस आणली
सर्वोच्च न्यायालय, भारताचे सरन्यायाधीश आणि पंतप्रधान यांच्यासंबंधीच्या खोट्या व्हिडिओंचा छडा लावला, जे लाखो वेळा पाहण्यात आले आहेत
भारतीय निवडणूक आयोग, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबद्दल चुकीची माहिती
पत्र सूचना कार्यालयाने तथ्य तपासले असता या यूट्यूब चॅनेल्सचे सुमारे 33 लाख सब्सक्रायबर्स असून 30 कोटींहून अधिक वेळा ते पाहण्यात आल्याचे आढळून आले
Posted On:
20 DEC 2022 3:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2022
भारतात खोटी माहिती पसरवणारी तीन युट्युब चॅनेल्स पीआयबी फॅक्ट चेक विभागाने 40 हून अधिक फॅक्ट -चेक मालिकेत, उघडकीस आणली आहेत. या यूट्यूब चॅनेल्सचे सुमारे 33 लाख सब्सक्रायबर्स आहेत आणि त्यांचे व्हिडिओ, ज्यातील बहुतेक सर्व खोटे असल्याचे आढळून आले असून 30 कोटींहून अधिक वेळा ते पाहण्यात आले आहेत.
पत्र सूचना कार्यालयाने प्रथमच सोशल मीडियावर खोटे दावे पसरवणाऱ्या वैयक्तिक पोस्ट लक्षात घेऊन सर्व युट्युब चॅनेल्सचा पर्दाफाश केला आहे. पत्र सूचना कार्यालयाने तथ्याची तपासणी केलेल्या युट्युब चॅनेलचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
Sl. No.
|
Name of YouTube Channel
|
Subscribers
|
Views
|
-
|
News Headlines
|
9.67 lakh
|
31,75,32,290
|
-
|
Sarkari Update
|
22.6 lakh
|
8,83,594
|
-
|
आज तक LIVE
|
65.6 thousand
|
1,25,04,177
|
ही युट्युब चॅनेल्स सर्वोच्च न्यायालय, भारताचे सरन्यायाधीश, सरकारी योजना, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, कृषी कर्जमाफी इत्यादींबाबत खोटे आणि खळबळजनक दावे पसरवत आहेत आणि यात खोट्या बातम्यांचा समावेश आहे . उदाहरणार्थ , सर्वोच्च न्यायालय आदेश देणार आहे की भविष्यातील निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जातील; बँक खाती, आधार कार्ड आणि पॅन कार्ड असलेल्या लोकांना सरकार पैसे देत आहे; ईव्हीएमवर बंदी, इत्यादींचा यात समावेश आहे.
युट्युब चॅनेल्स टीव्ही चॅनेलच्या बनावट लोगो आणि खळबळजनक थंबनेल (thumbnails) आणि त्यांच्या वृत्तनिवेदकांचे फोटो वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे, जेणेकरून प्रेक्षकांना विश्वास वाटेल की त्या बातम्या खऱ्या आहेत. ही चॅनेल्स त्यांच्या व्हिडिओंवर जाहिराती दाखवून आणि युट्युबवर खोट्या बातम्या देऊन कमाई करत असल्याचेही आढळून आले.
पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक विभागाने केलेल्या कारवाईनंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गेल्या वर्षभरात शंभरहून अधिक युट्युब चॅनेल्स ब्लॉक केली आहेत.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1885069)
Visitor Counter : 333
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam