पंतप्रधान कार्यालय
आंतरराष्ट्रीय विकलांग दिनानिमित्त दिव्यांग भगिनी आणि बंधुंनी दाखवलेले अविचल मनोधैर्य आणि मिळवलेल्या यशाबदद्ल पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
03 DEC 2022 9:28AM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय विकलांग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या दिव्यांग बंधु आणि भगिनींनी दाखवलेले अविचल मनोधैर्य आणि साध्य केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
आंतरराष्ट्रीय विकलांग दिनानिमित्त मी आमच्या दिव्यांग भगिनी आणि बंधुंनी दाखवलेले अविचल मनोधैर्य आणि साध्य केलेल्या कामगिरीचे मी कौतुक करतो. आमच्या सरकारने असंख्य असे उपक्रम हाती घेतले आहेत ज्यामुळे दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींसाठी अनेक संधी निर्माण झाल्या आहेत आणि त्यांना चमकदार कामगिरी करण्यासाठी सक्षम केले आहे.
दिव्यांगांना सहज प्रवेश शक्य व्हावा, यासाठी आमचे सरकार तितकेच आग्रही असून दिव्यांगांसाठी आखलेल्या अनेक महत्वाकांक्षी कार्यक्रमांत तसेच दिव्यांगांसाठी पायाभूत सुविधांचा मंच तयार करण्यात आल्याच्या घटनेत त्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचीही मी प्रशंसा करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
***
M.Jaybhaye/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880629)
Visitor Counter : 196
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam