अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑक्टोबर 2022 मधे एकत्रित जीएसटी महसूल संकलन 1,51,718 कोटी रुपये


एप्रिल 2022 नंतरचे आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च संकलन

सलग आठ महिने मासिक जीएसटी महसूल 1.4 लाख कोटी रुपयांहून अधिक, जीएसटी सुरू झाल्यापासून दुसऱ्यांदा पार केला 1.5 लाख कोटींचा टप्पा

सप्टेंबर 2022 मध्ये 8.3 कोटी ई-वे बिलांची निर्मिती, ऑगस्ट 2022 मध्ये तयार झालेल्या 7.7 कोटी ई-वे बिलांपेक्षा ती लक्षणीय अधिक आहे

Posted On: 01 NOV 2022 2:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2022

ऑक्टोबर 2022 मध्ये एकत्रित जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन 1,51,718 कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 26,039 कोटी, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 33,396 कोटी, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 81,778 कोटी  (माल आयातीवर संकलित केलेल्या रु. 37,297 कोटींसह) आणि उपकर 10,505 कोटी रुपये ( मालाच्या आयातीवर संकलित  केलेल्या रु. 825 कोटींसह) यांचा समावेश आहे. आत्तापर्यंतचा दुसरा उच्चांक आहे.

सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला  37,626 कोटी रुपये  आणि  सीजीएसटीला  32,883 कोटी रुपये चुकते केले आहेत. याव्यतिरिक्त, केंद्र आणि राज्यांमधे 50:50 च्या प्रमाणात, त्या आधारावर 22,000 कोटी रुपये देखील चुकते केले आहेत.

नियमित समझोत्यानंतर  ऑक्‍टोबर 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी  74,665 कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी 77,279 कोटी रुपये आहे.

ऑक्टोबर 2022 चा महसूल हा एप्रिल 2022 मधील संकलनानंतरचे दुसरे उच्चांकी मासिक संकलन आहे. जीएसटीने  दुसर्‍यांदा मासिक 1.50 लाख कोटी संकलनाचा टप्पा पार केला आहे.  ऑक्टोबर 2022 नंतर, देशांतर्गत व्यवहारांमधून दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च संकलन देखील पाहिले गेले. हा नववा महिना असून  सलग आठ महिने, मासिक जीएसटी महसूल 1.4 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.  सप्टेंबर 2022 मध्ये, 8.3 कोटी ई-वे बिले तयार झाली. ऑगस्ट 2022 मध्ये तयार झालेल्या 7.7 कोटी ई-वे बिलांपेक्षा ती अधिक होती.

खालील तक्त्यात चालू वर्षातील मासिक एकत्रित जीएसटी महसुलातील कल दर्शवला आहे. ऑक्टोबर 2021 च्या तुलनेत ऑक्टोबर 2022 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलाची  राज्यनिहाय आकडेवारी खालील तक्त्यांमध्ये दिली आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये जीएसटी महसुलाची राज्यवार वाढ

State

Oct-21

Oct-22

Growth

Jammu and Kashmir

648

425

-34%

Himachal Pradesh

689

784

14%

Punjab

1,595

1,760

10%

Chandigarh

158

203

28%

Uttarakhand

1,259

1,613

28%

Haryana

5,606

7,662

37%

Delhi

4,045

4,670

15%

Rajasthan

3,423

3,761

10%

Uttar Pradesh

6,775

7,839

16%

Bihar

1,351

1,344

-1%

Sikkim

257

265

3%

Arunachal Pradesh

47

65

39%

Nagaland

38

43

13%

Manipur

64

50

-23%

Mizoram

32

24

-23%

Tripura

67

76

14%

Meghalaya

140

164

17%

Assam

1,425

1,244

-13%

West Bengal

4,259

5,367

26%

Jharkhand

2,370

2,500

5%

Odisha

3,593

3,769

5%

Chhattisgarh

2,392

2,328

-3%

Madhya Pradesh

2,666

2,920

10%

Gujarat

8,497

9,469

11%

Daman and Diu

0

0

20%

Dadra and Nagar Haveli

269

279

4%

Maharashtra

19,355

23,037

19%

Karnataka

8,259

10,996

33%

Goa

317

420

32%

Lakshadweep

2

2

14%

Kerala

1,932

2,485

29%

Tamil Nadu

7,642

9,540

25%

Puducherry

152

204

34%

Andaman and Nicobar Islands

26

23

-10%

Telangana

3,854

4,284

11%

Andhra Pradesh

2,879

3,579

24%

Ladakh

19

33

74%

Other Territory

137

227

66%

Center Jurisdiction

189

140

-26%

Grand Total

96,430

1,13,596

18%

 

 

 

 

S.Bedekar/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1872651) Visitor Counter : 343